


फैजपूर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अँकर प्रकाश अँड पूजा प्रस्तुत आणि फैजपूरकरांचा चिंतामणी आयोजित भव्य-दिव्य ‘होम मिनिस्टर‘ कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सराफ गल्ली, फैजपूर येथे करण्यात आले आहे. फैजपूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या विशेष सोहळ्यामुळे परिसरातील लाडक्या बहिणींसाठी मनोरंजनाची आणि आनंदाची मोठी पर्वणी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमात मराठी गाण्यांची मेजवानी आणि लावणी गीतांची धम्माल अनुभवायला मिळणार असून, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मजेदार उखाणे व विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन महिलांना विविध खेळांचा आनंद लुटता येणार असून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या नशीबवान बहिणीस मानाची पैठणी आणि साडी देऊन विशेष गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात परिसरातील जास्तीत जास्त महिला व लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन खेळांचा व मनोरंजनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



