Home Cities यावल सायमा पटेलची स्पेलिंग बी स्पर्धेत गगनभरारी ; तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक

सायमा पटेलची स्पेलिंग बी स्पर्धेत गगनभरारी ; तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक

0
11


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गुणवत्तेच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेत मागे राहत नाहीत, हे यावल तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. शाळेतील इयत्ता सातवीत शिकणारी विद्यार्थिनी सायमा हारून पटेल हिने तालुकास्तरीय “स्पेलिंग बी” (Spelling Bee) स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण यावल तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे तिची आता पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली आहे.

तालुकास्तरीय इंग्रजी शब्द फेरीत सायमाने कठीण इंग्रजी शब्दांचे अचूक उच्चार आणि स्पेलिंग सांगत परीक्षकांची मने जिंकली. सायमाच्या या उल्लेखनीय यशाचे वृत्त कळताच दहिगावच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेत तिचे अत्यंत उत्साहात व जल्लोषात नागरी स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातील आणि त्यातही उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने इंग्रजी भाषेतील स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण यावल तालुक्यातून आणि शिक्षण वर्तुळातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शाळेत आयोजित विशेष कौतुक सोहळ्यात केंद्रप्रमुख विजयकुमार ठाकूर, मुख्याध्यापक कुतुबुद्दीन सर, मार्गदर्शक शिक्षिका नगमा मॅडम, मजीत सर, सुलेमान सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जफर खान पठाण आणि उपाध्यक्ष हारून पटेल यांनी सायमाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि तिला पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेत यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी मोलाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि सायमाच्या अथक परिश्रमांमुळेच हे यश शक्य झाल्याचे यावेळी मुख्याध्यापकांनी नमूद केले.


Protected Content

Play sound