Home आरोग्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट गिते यांच्याकडून ‘गोदावरी साप्ताहिका’सह शैक्षणिक...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट गिते यांच्याकडून ‘गोदावरी साप्ताहिका’सह शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक; डॉ. प्रशांत सोळंके यांनी घेतली सदिच्छा भेट

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट ए. गिते यांची सदिच्छा भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान कुलगुरूंनी गोदावरी फाउंडेशनतर्फे राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय उपक्रमांची दखल घेत ‘गोदावरी साप्ताहिका’चे विशेष कौतुक केले.

भेटीदरम्यान अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी गोदावरी फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती कुलगुरूंना दिली. या प्रसंगी वैद्यकीय शिक्षणाचा वाढता दर्जा, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधा, तसेच रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाला दिल्या जाणाऱ्या योगदानाबाबत उभयतांमध्ये सखोल चर्चा झाली. या वेळी फाउंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना व्यापक व्यासपीठ मिळवून देणारे ‘गोदावरी साप्ताहिक’ कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट गिते यांना भेट म्हणून देण्यात आले.

हे साप्ताहिक संस्थेच्या विद्यार्थी-केंद्रित आणि वैद्यकीय उपक्रमांना समाजापर्यंत पोहोचवण्याचे एक उत्तम माध्यम असल्याचे चर्चेदरम्यान अधोरेखित करण्यात आले. कुलगुरू प्रा. डॉ. व्यंकट ए. गिते यांनी फाउंडेशनच्या या सर्वसमावेशक कार्याची प्रशंसा करत भावी उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. ही सदिच्छा भेट शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील परस्पर समन्वय अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.


Protected Content

Play sound