Home Cities चोपडा कस्तुरबा विद्यालयाचा लोकनृत्य व भूमिका अभिनयात जिल्ह्यात डंका ; विभागीय स्पर्धेसाठी निवड

कस्तुरबा विद्यालयाचा लोकनृत्य व भूमिका अभिनयात जिल्ह्यात डंका ; विभागीय स्पर्धेसाठी निवड

0
11


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेत चोपडा येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाच्या विद्यार्थी संघाने लोकनृत्य तसेच भूमिका अभिनय या दोन्ही कला प्रकारांत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

जळगाव येथील नूतन मराठा अध्यापक विद्यालयात जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लोकनृत्य आणि भूमिका अभिनयाला परीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही कला प्रकारांत कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या संघाने प्रभावी सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळविला. डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा नोडल अधिकारी तथा अधिव्याख्याता डॉ. संगीता पाटील (महाजन) यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली. डॉ. कविता चव्हाण आणि अधिव्याख्याता श्री. शैलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पंकज पाटील, अजय पाटील आणि कु. हितेशना पवार यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण करताना कला, आशय, अभिनय, सादरीकरणातील प्रभावीपणा आणि लोककलेचे दर्शन या विविध बाबींचा विचार करण्यात आला.

कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या या यशामागे शिक्षक एन. आर. पाटील आणि श्रीमती एम. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण सरावामुळे तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे दोन्ही कला प्रकारांत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणे शक्य झाले. आता विद्यालयाचा संघ विभागीय स्तरावरील स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या दुहेरी यशाबद्दल संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, सचिव डॉ. स्मिताताई पाटील, संचालक आदित्य पाटील, मुख्याध्यापक एस. एल. पाटील, उपमुख्याध्यापक, निरीक्षण समितीचे सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound