


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय विवाहितेवर तिच्या घरात घुसून अत्याचार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून रावेर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पीडित विवाहिता घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी अरुण भागवत यवतकर हा तिच्या घराजवळ आला. त्यानंतर त्याने कथितरित्या बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला आणि घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला.
यावेळी आरोपीने पीडितेला मारहाण करून तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे रावेर पोलिसांनी आरोपी अरुण यवतकर याच्याविरुद्ध बलात्कारासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सखाराम कांबळे करीत आहेत. पोलिसांकडून घटनेच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे.



