Home Cities जळगाव पावसाळ्यात शेतात मोटारसायकल पार्क करताय? सावधान! उबदार जागेच्या शोधात गाडीत दडू शकतो...

पावसाळ्यात शेतात मोटारसायकल पार्क करताय? सावधान! उबदार जागेच्या शोधात गाडीत दडू शकतो साप ; मुक्ताईनगरातील घटनेनंतर शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

0
2


मुक्ताईनगर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पावसाळ्याच्या दिवसांत शेतशिवारात गवत, झुडपे आणि ओलसर जागा वाढल्याने सापांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतात कामानिमित्त मोटारसायकल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांनी वाहन पार्क करताना तसेच काही वेळाने पुन्हा सुरू करताना विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. जरासा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो, असाच एक थरारक प्रकार नुकताच मुक्ताईनगर तालुक्यात समोर आला आहे.

मुक्ताईनगर येथील प्रदीप काळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामानिमित्त स्वमालकीची मोटारसायकल घेऊन गेले होते. त्यांनी आपली गाडी शेतात पार्क केली असता, पावसापासून बचाव करण्यासाठी आणि उबदार जागेच्या शोधात असलेल्या एका सापाने थेट त्यांच्या मोटारसायकलमध्ये आसरा घेतला. हा साप मोटारसायकलच्या इंजिनजवळील भागात, सीटखाली किंवा एअर फिल्टरच्या आडोशाने सुरक्षित जागेत दडून बसला होता. काम आटोपल्यानंतर प्रदीप काळे यांनी गाडी सुरू केली आणि ते चालवत असताना त्यांच्या ही बाब अचानक लक्षात आली. सुदैवाने वेळेवर हा प्रकार समोर आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.

शेतात किंवा उघड्या जागेवर मोटारसायकल काही वेळ उभी केल्यानंतर ती पुन्हा सुरू करताना थेट हात न घालता प्रथम वाहनाभोवती नीट पाहणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात उबदारपणा मिळवण्यासाठी साप सहसा गाडीच्या इंजिनचा भाग, सीटखालील परिसर किंवा सायलेन्सरच्या जवळ आसरा घेतात. त्यामुळे गाडी सुरू करण्यापूर्वी सीटखालील भाग, इंजिन परिसर आणि चाकांजवळ काठीच्या साहाय्याने सुरक्षित अंतर ठेवून नीट तपासणी करावी. जर वाहनामध्ये साप आढळलाच, तर त्याला मारण्याचा किंवा स्वतः पकडण्याचा धाडसी प्रयत्न अजिबात करू नये. अशा वेळी तातडीने स्थानिक सर्पमित्र किंवा प्रशिक्षित व्यक्तींशी संपर्क साधून त्यांची मदत घ्यावी.


Protected Content

Play sound