Home Cities भुसावळ भुसावळात स्व. गोदावरी आईंच्या प्रथम स्मृतिदिनी भावपूर्ण अभिवादन 

भुसावळात स्व. गोदावरी आईंच्या प्रथम स्मृतिदिनी भावपूर्ण अभिवादन 

0
12


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील वांजळा रोडवरील ‘आपल्या परिवार सामाजिक वाचनालयात’ ३ सप्टेंबर रोजी स्व. गोदावरी आई यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी स्व. गोदावरी आई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

हा अभिवादन सोहळा ज्येष्ठ नागरिक अशोक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्व. गोदावरी आई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी जयंत जंजाळे यांनीही पुष्पमाला अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. उपस्थितांनी स्व. गोदावरी आई यांच्या सामाजिक, कौटुंबिक आणि सेवाभावी कार्याचा मनमोकळेपणाने गौरव केला. त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि समाजातील प्रत्येक घटकाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध यामुळे त्यांच्या आठवणी कायम सर्वांसाठी प्रेरणादायी राहतील, अशा भावना वक्त्यांनी व्यक्त केल्या.

कार्यक्रमा दरम्यान मार्गदर्शन करताना उपस्थितांनी स्व. गोदावरी आईंच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी निर्माण केलेला विचारांचा आणि मूल्यांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या स्मृतिदिनाचे औचित्य साधून उपस्थितांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा आणि मानवतेची सेवा करण्याचा दृढ संकल्प केला. या कार्यक्रमास भुसावळ शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक तसेच परिवार आणि वाचनालयाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन अत्यंत उत्साहात करण्यात आले. उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून स्व. गोदावरी आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


Protected Content

Play sound