Home Uncategorized हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! ४ पीडित महिलांची सुटका, ग्राहक अन् चालकांसह ३ जणांवर...

हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश! ४ पीडित महिलांची सुटका, ग्राहक अन् चालकांसह ३ जणांवर कारवाई

0
3


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील एका  घरात सुरु असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायावर स्थानिक मानव तस्करीविरोधी पथक आणि रामानंद नगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकण्यात आलेल्या या धाडीमुळे शहर आणि परिसर हादरला असून कारवाईदरम्यान तब्बल ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे, तर वेश्याव्यवसाय चालवणाऱ्यांसह ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा भागात एका घरात बेकायदेशीरपणे वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती मानव तस्करीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण परिसराची खात्री करून छुप्या पद्धतीने सापळा रचला. पोलिसांच्या पथकाने प्रथम एका पंटरला पाठवून खात्री केली आणि इशारा मिळताच बंगल्यावर अचानक धाड टाकली.

या धडक कारवाई दरम्यान घटनास्थळावरून ४ पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. तसेच वेश्याव्यवसायासाठी आलेल्या ३ ग्राहकांना आणि १ पंटरला पोलिसांनी ताब्यात घेतले. हा अनैतिक व्यवसाय चालवणारी १ महिला आणि २ पुरुष अशा एकूण ३ मुख्य आरोपींविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. अचानक पडलेल्या या धाडीमुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मानव तस्करीविरोधी पथक आणि रामानंद नगर पोलिसांच्या या धडक संयुक्त कारवाईमुळे पिंप्राळा परिसरातील बेकायदेशीर वेश्याव्यवसाय उघडकीस आला असून पोलिसांनी ४ महिलांची सुटका करत ३ आरोपींसह ग्राहकांना ताब्यात घेतले आहे.


Protected Content

Play sound