जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हारसेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना आणि सांस्कृतिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात तब्बल २०० विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण होऊन रोजगारक्षम बनावे, मात्र त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीही जपावी, असे आवाहन आमदार राजूमामा भोळे यांनी केले.
जळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सभागृहात आयोजित या कार्यक्रमात समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा तसेच नीट, जेईई आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या २०० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांनी मोठी उपस्थिती लावली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाना बोरसे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. गोपाल घोलप, सुभाष सोनवणे,दुध फेडरेशनचे संचालक अरविंद देशमुख, MSEBचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता योगेश सोनवणे, नक्षत्र एनर्जी सोल्युशन च्या संचालिका मनीषा सोनवणे,नगरसेवक राहुल पाटील,धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष प्रभाकर न्हाळदे ,सुभाष करे,PI निवृत्ती बोराडे,डॉ.सिद्धांत घोलप, रमेश सुलताने, गणेश सैंदाणे,धरणगाव एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलिप धनगर, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल,हिलाल सोनवणे,अहिल्या महिला संघाच्या जिल्हाध्यक्ष प्रमिला कंखरे, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तूळशीराम सोनवणे,विष्णुआप्पा ठाकरे,दशरथ नाना लांडगे, गणेश जाने, नागेश हाडपे, गोपाल देशमुख,नामदेव सावळे,आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सुरेश भोळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन करावे, असे सांगितले. समाजासाठी काही देणे लागतो, या भावनेतून कार्य करण्याची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवावे आणि समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. यशाच्या प्रवासात साथ देणाऱ्या व्यक्तींचे ऋण कायम स्मरणात ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नाना बोरसे यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून दूर राहून शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. उच्च शिक्षण घेऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी समाजकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा, उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांत पुढे यावे, असे प्रतिपादन केले.
दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, संस्कार पुस्तके, प्रमाणपत्रे आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार देण्यात आले.
नक्षत्र एनर्जी सोल्युशनच्या संचालिका मनीषा योगेश सोनवणे यांच्या माध्यमातून स्मृतिचिन्हे व सन्मानपत्रे देण्यात आली. तसेच कर्मयोगिनी प्रगती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश सुलताने आणि विजय शिरसाठ यांनी जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील पुस्तके विद्यार्थ्यांना भेट दिली.
सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले, तर तुळशीराम सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मा सोनवणे, रामचंद्र चर्हाटे, अरुण ठाकरे, संतोष कचरे,तुळशीराम सोनवणे, सुभाष खोमणे, डिगंबर धनगर, महिंद्र सोनवणे,प्रवीण पवार, भारती ठाकरे, सुवर्णा धनगर,दिपक धनगर,डॉ. संजय पाटील,यशवंत शिरोळे, शरद न्हाळदे, अनिल मनोरे, पांडुरंग पवार, भरत न्हाळदे,मयुर ठाकरे, विलास न्हाळदे यांनी परिश्रम घेतले.



