Home आरोग्य रायपूर येथे मोफत आरोग्य शिबिर ; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रायपूर येथे मोफत आरोग्य शिबिर ; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
9

रायपूर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रायपूर येथील जनसेवा हॉस्पिटलमध्ये हरसिद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगाव यांच्या वतीने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात गरजू लाभार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार त्यांना मोफत उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी रायपूर व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध व्हावी, तसेच वेळेवर आजारां निदान व उपचार मिळावेत, यासाठी अशा आरोग्य शिबिरांचे महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर रवी कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर शोएब खान, डॉक्टर एस. डी. भोईटे, सिस्टर रुपाली चव्हाण आणि पीआरओ मनोज महाजन यांनी परिश्रम घेतले. वैद्यकीय तपासणीपासून लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन देण्यापर्यंत सर्व प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यात आली. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही करण्यात यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली. रायपूर येथील मोफत आरोग्य शिबिरामुळे अनेक गरजू नागरिकांना तपासणी व उपचाराचा लाभ मिळाला असून, ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला


Protected Content

Play sound