Home उद्योग सावद्यात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या ‘बनाना सिटी चॅप्टर’चे भव्य उद्घाटन 

सावद्यात सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या ‘बनाना सिटी चॅप्टर’चे भव्य उद्घाटन 

0
6

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उद्योजकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत व्यावसायिक नेटवर्क अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट (SCGT)च्या **‘सावदा बनाना सिटी सॅटेलाईट चॅप्टर’**चे उद्घाटन आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शनिवारी (दि. १ ऑगस्ट) सावदा येथील कुलसुमाबाई मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या दिमाखदार सोहळ्यास सावदा आणि परिसरातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमन व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. अजित मराठे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंगाळे गोल्डचे संचालक भागवतदादा भंगाळे उपस्थित होते. तसेच एससीजीटीचे सीओए व्ही. पी. कुलकर्णी आणि डेप्युटी सेक्रेटरी जनरल अमोल पिंपळेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. यावेळी सावदा बनाना सिटी चॅप्टरच्या नव्या कार्यकारिणीने अधिकृत पदभार स्वीकारला. ॲड. अमोल रामचंद्र चौधरी यांनी चेअरमन, गुणवंत नेमाडे यांनी सेक्रेटरी तर ऋषिकेश सुनील पाटील यांनी खजिनदार म्हणून पदग्रहण केले. याचबरोबर चॅप्टरच्या संस्थापक सदस्यांचेही अधिकृत इन्स्टॉलेशन करण्यात आले.

या चॅप्टरमध्ये शेखर कासार, टेकचंद सरोदे, सागर प्रमोद पाटील, संतोष दत्तू निमगडे, प्रतीक अरुण होले, सागर कोष्टी, ओमप्रकाश महाजन, प्रफुल्ल भागवत पाटील, मंगेश एन. महाजन, मिलन अनिल महाजन, हितेश गोपाल सुपे, खिलचंद कांतीलाल बोंडे, गौरव अशोक भंगाळे, दिनेश सुरेश जावळे, तन्मय सतीश पाटील आणि सागर व्ही. पाटील या उद्योजकांनी संस्थापक सदस्य म्हणून सहभाग नोंदविला.अध्यक्षीय भाषणात डॉ. अजित मराठे यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या “१०० उद्योजक – १०० कोटींची उलाढाल” या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचा उल्लेख करत उद्योजकांनी मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे भागवतदादा भंगाळे यांनी व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. अमोल पिंपळेकर यांनी आर्थिक नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले, तर व्ही. पी. कुलकर्णी यांनी आपल्या ५४ वर्षांच्या व्यावसायिक अनुभवातून उद्योजकांना प्रेरणादायी विचार दिले.

सावदा बनाना सिटी चॅप्टरच्या स्थापनेसाठी नॉर्थ रीजन एक्सपॅन्शन हेड राजेश चौधरी, जळगाव रीजन हेड इंजि. अभिजीत पाटील आणि डेप्युटी रीजन हेड डॉ. दीपक पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी जळगाव चॅप्टर-१, जळगाव चॅप्टर-२, जळगाव एमआयडीसी आणि भुसावळ चॅप्टरच्या पदाधिकाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन करण्यात आले. ऋषिकेश पाटील आणि गौरव भंगाळे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या शेवटी सेक्रेटरी गुणवंत नेमाडे यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, सदस्य आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर सर्व मान्यवर आणि उपस्थित उद्योजकांनी खास आयोजित करण्यात आलेल्या खान्देश स्पेशल स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.


Protected Content

Play sound