फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर येथे थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठी पसंती मिळत आहे.
तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन तसेच मेकॅनिकल अभियांत्रिकी या शाखांमध्ये थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून महाविद्यालय प्रशासनाने आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, CAP Round III साठी ऑप्शन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत २९ जुलै ते ३० जुलै २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. तसेच संस्थास्तरावरील प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत महाविद्यालयाशी संपर्क साधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या वैशिष्ट्यांमध्ये गुणवत्तापूर्ण अध्यापन पद्धती, समृद्ध ग्रंथालय व बुक बँक सुविधा, स्वतंत्र वसतिगृह, अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापकवर्ग, अत्याधुनिक प्रयोगशाळा व कार्यशाळा, उत्कृष्ट निकालांची परंपरा तसेच इंटरनेट सुविधा यांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी पोषक वातावरण उपलब्ध असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत OBC, SC, ST, VJ-NT, SBC, EWS, SEBC तसेच EBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नियमानुसार विविध शुल्क सवलतींचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनाही तांत्रिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशाची संधी दवडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण, आधुनिक सुविधा आणि शिष्यवृत्ती योजनांचा लाभ यामुळे जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, फैजपूर हे विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत असून, प्रवेश प्रक्रियेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.



