Home क्राईम जळगावात बेशिस्त पार्किंगमुळे हाणामारी : परस्परांविरुद्ध तक्रार

जळगावात बेशिस्त पार्किंगमुळे हाणामारी : परस्परांविरुद्ध तक्रार


two trucks

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील शाहुनगर ट्रॅफिक गार्डन भागातील मदरशाजवळ रिक्षा, ट्रक लावण्यावरुन हाणामाऱ्या होण्याच्या घटना आता नेहमीच्याच झाल्या आहेत. काल (दि.२) संध्याकाळी चक्क दोन ट्रक्‍स अर्धा रस्ता व्यापुन लावण्यात आल्या होत्या. शनिवारी सकाळी येण्या-जाण्यास रस्ता नसल्याने एकास रिक्षा बाजूला घेण्यास सांगीतले म्हणुन हाणामारी झाल्याची घटना घडली.

 

या हाणामारीनंतर शहर पोलिसांत परस्पर विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली असून त्यात रिक्षाचालक अफसर अन्वर भिस्ती (वय-26,रा.भिस्तीवाडा) याने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, रिक्षा लावण्याच्या कारणावरुन फिरोज खान सलीम खान, हज्जो खान, रुबीना शेख इद्रिस, इद्रिस शेख यांनी त्याला मारहाण करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच नगिनाबी अन्वर भिस्ती यांना धक्काबुक्की केली. दुसऱ्या तक्रारीत कार चालक फिरोज खान सलीम खान याने दिलेल्या तक्रारीनुसार, अफसर अन्वर भिस्ती याची रिक्षा रस्त्यात लागलेली असल्या कारणाने, त्याला वाहन काढण्यास सांगीतल्यावरुन वाद होवुन त्याचे वडील अन्वर भिस्ती, नदिम भिस्ती, नम्मो अन्वर भिस्ती अशांनी मारहाण करुन धक्काबुकी केली. तसेच सहा महिन्यातच तुला ठार मारेल, अशी धमकी दिली. ही हाणामारी सोडवण्यास आलेल्या हजराबी सलीम खान यांना नम्मो भिस्ती यांनी धक्कबुक्की करुन मारहाण केल्याचेही नमुद करण्यात आले आहे. दोन्ही परस्पर विरुद्ध तक्रारींवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound