Home Cities यावल उंटावद जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्याम भिल ; उपाध्यक्षपदी सतीष...

उंटावद जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्याम भिल ; उपाध्यक्षपदी सतीष पाटील यांची निवड

0
1

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील उंटावद येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. या निवडीत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्याम प्रमोद भिल यांची तर उपाध्यक्षपदी सतीष रमेश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे शाळेच्या विकासकामांना आणि शैक्षणिक गुणवत्तेला अधिक चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

उंटावद येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सदस्यांनी एकमताने श्याम प्रमोद भिल यांची अध्यक्षपदी निवड केली, तर सतीष रमेश पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांचे उपस्थित ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी अभिनंदन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच उंटावदचे सरपंच छोटू भगवान भिल, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शशीकांत (शशी आबा) गुलाबराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य डिगंबर धना सपकाळे, मावळते अध्यक्ष विकास विवेक पाटील, पोलीस पाटील हर्षल राजेंद्र पाटील, ह.भ.प. श्रीराम बापूराव पाटील, भिकन बळवंत पाटील, निबा कोळी, दीपक पाटील, प्रशांत प्रमोद पाटील, राजू नाईक, शांताराम भिल, गजु भिल, सुनील कोळी, संतोष सपकाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अनिल पाटील आणि विनोद पाटील सर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, मूलभूत सुविधा वाढविण्यासाठी तसेच पालक आणि शिक्षक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येतात. त्यामुळे नव्या कार्यकारिणीच्या निवडीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले होते. श्याम भिल आणि सतीष पाटील यांच्या निवडीमुळे उंटावद जिल्हा परिषद शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound