धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या वारकरी भाविकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या उधना–मिरज (पंढरपूर) विशेष रेल्वेचे धरणगाव रेल्वे स्थानकावर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. यावेळी वारकरी भाविकांना फराळाचे वाटप करून सेवाभावाचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेने तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व युवा नेते प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. विशेष रेल्वे धरणगाव स्थानकावर दाखल होताच शिवसैनिक आणि युवासैनिकांनी वारकऱ्यांचे टाळ्या व जयघोषात स्वागत केले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना प्रेमपूर्वक फराळाचे वाटप करण्यात आले. अल्पावधीत अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या उपक्रमाला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सेवाभावातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल अनेक वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी स्थानिक स्तरावर करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी प्रतापराव पाटील यांच्यासह दिनेश कडोसे (पाळधी), गोपाल (बांभोरी), दीपक भदाणे (बिलखेडा), गणेश भिंगणे (श्यामखेडा), रोहित पाटील (बाभळे), मंगेश पाटील (बाभळे), राज वाघरे (धरणगाव), नयन वाघरे (धरणगाव), भावेश पाटील (गारखेडा), योगेश पाटील (गारखेडा), जिग्नेश पाटील (गारखेडा), प्रवीण पाटील (बाभळे), रोनक पाटील (बाभळे), राज माळी (धरणगाव), बंटी भदाणे (बिलखेडा) यांच्यासह धरणगाव तालुक्यातील शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




