Home Cities यावल यावल कृषी उत्पन्न बाजार समितीला नवे संचालक ; व्यापारी गटातून डॉ. निलेश...

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीला नवे संचालक ; व्यापारी गटातून डॉ. निलेश गडे तर ग्रामपंचायत गटातून सौ. स्विटी बेंडाळे यांची सर्वानुमते निवड

0
21

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत व्यापारी गटातून केळी ग्रुपचे मालक तथा प्रगतशील शेतकरी डॉ. निलेश सुरेश गडे आणि ग्रामपंचायत गटातून न्हावी येथील सौ. स्विटी उमेश बेंडाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे बाजार समितीच्या संचालक मंडळात दोन नवीन चेहऱ्यांचा समावेश झाला आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती उज्जैनसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून रिक्त असलेल्या व्यापारी गटातील संचालकपदासाठी डॉ. निलेश सुरेश गडे यांची तर ग्रामपंचायत गटातील संचालकपदासाठी न्हावी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी संचालक उमेश बेंडाळे यांच्या पत्नी सौ. स्विटी उमेश बेंडाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. डॉ. निलेश गडे हे भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात असून, ते केळी ग्रुपचे मालक तसेच शेती क्षेत्रात सक्रिय असलेले प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या निवडीमुळे व्यापारी गटाला बाजार समितीच्या कामकाजात नवे नेतृत्व मिळाले आहे. तर सौ. स्विटी बेंडाळे यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायत गटाचे प्रतिनिधित्व अधिक बळकट झाले आहे.

या सर्वसाधारण सभेला सभापती उज्जैनसिंग राजपूत, उपसभापती दीपक चौधरी, संचालक तथा माजी सभापती राकेश फेगडे, संचालक उमेश पाटील, सुनील बारी, सूर्यभान पाटील, अशोक चौधरी, संचालिका सौ. कांचन फालक, सौ. राखी बऱ्हाटे, पंकज चौधरी यांच्यासह बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे आणि सर्व संचालक उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालक डॉ. निलेश गडे आणि सौ. स्विटी बेंडाळे यांचे केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार अमोल हरिभाऊ जावळे, आमदार नंदू महाजन, आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound