Home क्राईम तरूणाचे अपहरण करणारे पोलिसांच्या ताब्यात

तरूणाचे अपहरण करणारे पोलिसांच्या ताब्यात

0
53

चाळीसगाव प्रतिनिधी । येथून अपहरण केलेल्या तरूणाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडवून त्यांना गजाआड करण्यात चाळीसगाव पोलिसांना यश आले आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील माताजी ट्रेडर्सच्या समोरील निवासी गजानन मदनलाल जांगीड (वय२०) या तरूणाला काही जणांनी १९ रोजी पळवून नेले होते. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी चाळीसगावचे अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, व उपविभागीय पोलीस अधिकारी नजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक रामेश्‍वर गाडे-पाटील यांनी शोध पथक नेमले होते. यामध्ये उपनिरिक्षक राजेश घोडवे यांच्यासह नितीन पाटील, गोवर्धन बोरसे, गोपाल बेलदार यांचा समावेश होता. या पथकाने तपासाची चक्रे फिरवून अपहरणकर्ते हे राजस्थानमधील कोटा परिसरात असल्याचे जाणून घेतले. यानंतर पोलिसांच्या या पथकाने मुख्य अपहरणकर्ता बलवीरसिंह गोपालसिंह जाखड (वय २४, रा. करीरोकी ढानी, जिल्हा सिकर, राजस्थान) याच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यात असणार्‍या गजानन जांगीडची सुटका केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound