Home आरोग्य विशेष मुलांच्या पालकांसाठी ताण व्यवस्थापन कार्यशाळा ; सकारात्मक पालकत्वासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

विशेष मुलांच्या पालकांसाठी ताण व्यवस्थापन कार्यशाळा ; सकारात्मक पालकत्वासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. “पालक सक्षम तर विशेष मुलांचे भविष्य अधिक सक्षम!” या संकल्पनेतून इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा जळगाव संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC) यांच्या वतीने विशेष मुलांच्या पालकांसाठी “ग्रुप थेरपी व ताण व्यवस्थापन (Stress Management)” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत पालकांना मानसिक आरोग्य, भावनिक संतुलन आणि सकारात्मक पालकत्वाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


Protected Content

Play sound