Home Cities मुक्ताईनगर खा. विनोद तावडे यांनी घेतली आ. एकनाथराव खडसेंची भेट ! : राजकीय...

खा. विनोद तावडे यांनी घेतली आ. एकनाथराव खडसेंची भेट ! : राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

0
5


मुक्ताईनगर-पंकज कपले । भाजपचे दिग्गज नेते विनोद तावडे यांनी आमदार एकनाथराव खडसे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर, नाथाभाऊंनी ही भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथराव खडसे हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले असतांनाच आता एका भेटीमुळे याला मोठे बळ लाभले आहे. भारतीय जनता पक्षाचे बडे प्रस्थ मानले जाणारे नेते खासदार तथा पक्षाचे महासचिव विनोद तावडे यांनी आ. एकनाथराव खडसे यांची भेट घेतली असून हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या संदर्भातील नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने आ. एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, विनोद तावडे हे रक्षाताई खडसे यांची भेट घेण्यासाठी माझ्या मुंबई येथील निवासस्थानी आले होते. तेव्हा त्यांनी माझी देखील भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. तसेच या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून वैयक्तीक वार्तालाप झाला ! असे आमदार खडसे म्हणाले.

आमदार एकनाथ खडसे हे आपल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाला अर्थात २ सप्टेंबर रोजी मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतांना विनोद तावडे यांनी त्यांची घेतलेली भेट ही नव्या चर्चेला जन्म देणारी ठरली आहे.


Protected Content

Play sound