Home क्राईम माणुसकीला काळिमा : वयोवृद्ध माऊलीवर नराधमाचा अत्याचार; आरोपी गजाआड !

माणुसकीला काळिमा : वयोवृद्ध माऊलीवर नराधमाचा अत्याचार; आरोपी गजाआड !

0
3


फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यामधून एक संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका ४५ वर्षांच्या व्यक्तीने घरात एकट्या असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध माऊलीवर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

तहान लागल्याचे नाटक करून घरात प्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना सोमवारी दुपारी घडली. पीडित वृद्ध महिला आपल्या घरामध्ये एकटीच बसून भुईमुगाच्या शेंगा सोलत होती. दरम्यान, घरात कोणीही नसून महिला एकटीच असल्याचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने रवी चव्हाण (वय ४५ ) हा तिच्या घराबाहेर आला. त्याने वृद्धेकडे पिण्यासाठी पाणी मागितले. वृद्ध महिला पाणी आणण्यासाठी जशी घरात गेली, तसा आरोपी रवी चव्हाण चोरपावलांनी तिच्या पाठीमागे घरात घुसला.

स्वयंपाकघरात नेऊन अत्याचार

आरोपीने वृद्धेच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर अचानक झडप घातली. तिला ओढत घराच्या मागच्या बाजूला असलेल्या स्वयंपाक खोलीत नेले आणि तिथे तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या अघोरी प्रकारामुळे वृद्ध महिला प्रचंड मानसिक धक्क्याखाली आणि भीतीखाली आली होती. समाजात बदनामी होईल या धास्तीपोटी तिने सुरुवातीला कोणाकडेही अवाक्षर काढले नाही.

अखेर पोलिसांत तक्रार; आरोपी गजाआड

सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर, पीडित वृद्धेने अखेर धीर एकवटला आणि मंगळवारी आपल्या कुटुंबीयांना घडलेला सर्व आपबिती सांगितली. हे ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने फैजपूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ चक्रे फिरवली आणि संशयित आरोपी रवी चव्हाण याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करत आहेत. या भयंकर प्रकारामुळे खळबळ उडाली असून परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound