Home Uncategorized प्रेषितांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुन्नी मुस्लिम बांधव आक्रमक; कारवाईची मागणी

प्रेषितांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यावरून सुन्नी मुस्लिम बांधव आक्रमक; कारवाईची मागणी

0
11


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । इस्लाम धर्मियांचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद सलै. आणि त्यांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत जळगाव जिल्ह्यातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे. संबंधित व्यक्तीवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सुन्नी मुस्लिम बांधवांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नाझिया इलाही खान यांनी प्रेषित हजरत मुहम्मद सलै. आणि त्यांच्या पत्नींबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन चुकीचे व आक्षेपार्ह वक्तव्य केले असून, त्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. अशा वक्तव्यांमुळे समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणी संबंधित व्यक्तीला लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांवर कायदेशीर पातळीवर कठोर भूमिका घेण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी केली.

जर संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात आली नाही, तर सुन्नी मुस्लिम बांधवांच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे. शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यावेळी सुन्नी जामा मस्जिद जळगाव व सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांच्यासह रशीद कुरैशी, सय्यद उमर, फारूख शौकत तंवर, अमान बिलाल, मुस्तकीम हमीद, परवेझ पटवे, मोईन अली आदी मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound