Home क्राईम सामूहिक अत्याचाराच्या घटनेने खळबळ; १४ जणांना अटक

सामूहिक अत्याचाराच्या घटनेने खळबळ; १४ जणांना अटक

0
52


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फत्तेपूर पोलीस ठाणे हद्दीतील देऊळगाव–कापूसवाडी मार्गावरील ठांबरडा नाला परिसरात २ जून २०२६ रोजी घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांनी जलद व धडक कारवाई करत एकूण १५ पैकी १४ आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात व शांत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून रोजी सायंकाळी ४० वर्षीय पीडित महिला तिच्या परिचितासोबत सदर निर्जन परिसरात असताना काही तरुणांचा गट तेथे आला. त्यानंतर संबंधितांनी धमकावून गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याचा आरोप आहे. या घटनेदरम्यान काही आरोपींनी मोबाईलवर चित्रीकरण केल्याची आणि त्यापैकी एकाने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची माहितीही समोर आली आहे, ज्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले.

घटनेची माहिती मिळताच फत्तेपूर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तपासादरम्यान विविध पथकांनी कारवाई करत आतापर्यंत १५ पैकी १४ आरोपींना अटक केली असून उर्वरित एका आरोपीचा शोध सुरू आहे.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ७०(१), ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत कलम ६६ व ६७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सोशल मीडियावर अशा संवेदनशील प्रकरणांबाबत कोणतीही अनधिकृत माहिती प्रसारित न करण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound