Home Cities यावल यावल ग्रामीण पूर्व काँग्रेस ब्लॉक अध्यक्षपदी शेखर पाटील यांची निवड 

यावल ग्रामीण पूर्व काँग्रेस ब्लॉक अध्यक्षपदी शेखर पाटील यांची निवड 

0
8


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सौखेडा सिम या ग्रामीण भागातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारे तसेच यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या यावल ग्रामीण पूर्व विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानांतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक समितीच्या जिल्हा दौऱ्यादरम्यान पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली होती. या प्रक्रियेनंतर शेखर सोपान पाटील यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत त्यांची यावल ग्रामीण पूर्व ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. शेखर पाटील यांनी यापूर्वी यावल पंचायत समितीमध्ये काँग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सदस्य गटाचे गटनेते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांशी असलेला संपर्क, सामाजिक कार्यातील सहभाग आणि पक्ष संघटनेतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने शेखर सोपान पाटील यांची यावल ग्रामीण पूर्व ब्लॉक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शेखर पाटील यांच्या निवडीबद्दल माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार तसेच फैजपूर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि काँग्रेसचे विविध पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound