Home राजकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आ. चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आ. चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

0
17


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत शाळेकडे जाणारा रस्ता स्वखर्चातून तयार करून दिला आहे. पावसाळ्यात रस्त्याअभावी विद्यार्थ्यांना आणि पालकांना होणारा त्रास दूर झाल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी पूर्वी व्यवस्थित रस्ता उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिखल आणि साचलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.

ही समस्या पालकांनी गावाचे माजी सरपंच रुपेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्काळ आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांना होत असलेल्या गैरसोयीची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या अडचणींची दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने स्वखर्चातून शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर मुरूम टाकून रस्ता तयार करून दिला. या कामामुळे विद्यार्थ्यांना आता सुरक्षित आणि सुलभपणे शाळेत ये-जा करता येणार आहे.

रस्ता तयार झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी समाधान व्यक्त केले असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्वरित निर्णय घेतल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी सरपंच रुपेश पाटील यांचे आभार मानले आहेत. स्थानिक नागरिकांनीही या कामाचे स्वागत केले असून, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे अशाच प्रकारे प्राधान्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.


Protected Content

Play sound