Home Uncategorized भाजप जळगाव महानगर माजी सैनिक आघाडीची नूतन कार्यकारिणी घोषित; जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मराठे

भाजप जळगाव महानगर माजी सैनिक आघाडीची नूतन कार्यकारिणी घोषित; जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मराठे

0
23


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा माजी सैनिक आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून माजी सैनिकांच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री, प्रदेश नेतृत्व आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा माजी सैनिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र दगडू मराठे यांनी दि. ११ जून २०२६ रोजी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली.

यावेळी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, विभाग संघटनमंत्री रविजी अनासपुरे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे आणि जिल्हाध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार माजी सैनिक आघाडीची कार्यकारिणी निश्चित करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीत जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र दगडू मराठे यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली असून उपाध्यक्षपदी चंद्रकांत डी. पाटील, अरुण एस. इंगळे, दिलीप बडगुजर, तुकाराम मंगो सपकाळे, विलास पाटील, रमेश सूर्यवंशी, सुधाकर जे. चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

सरचिटणीसपदी रामचरण एम. रडे, छगन दगडू पाटील आणि आशालता राणे यांची नियुक्ती करण्यात आली असून चिटणीसपदी प्रवीण संतोष पाटील, गोपाल पवार, संदीप पाटील, पांडुरंग पाटील, निवेदिता थाटे आणि मधुकर देविदास चौधरी यांचा समावेश करण्यात आला आहे. कोषाध्यक्षपदी नेमीचंद टी. पाटील आणि रतीलाल चव्हाण यांची जबाबदारी सोपविण्यात आली असून प्रसिद्धी प्रमुखपदी एम.डी. सूर्यवंशी, हनीफ शेख आणि दिनकर पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्रमुखपदी एस.एस. भुसांडे आणि प्रल्हाद सुखदेव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय सल्लागारपदी डी.एन. सोनवणे आणि गोपाल भोळे, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल बडगुजर, पी.एन. राठोड, राठोड आणि रविंद्र चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी सैनिक आघाडीच्या माध्यमातून माजी सैनिकांच्या समस्या, कल्याणकारी योजना आणि संघटनात्मक कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नवीन कार्यकारिणीच्या घोषणेनंतर पदाधिकाऱ्यांवर भाजप कार्यकर्ते आणि माजी सैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भाजपा जळगाव महानगर माजी सैनिक आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्याने संघटनेच्या कामाला नवी दिशा मिळणार असून माजी सैनिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound