Home Cities जळगाव जनार्दन चौधरी यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

जनार्दन चौधरी यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

0
27


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलात तब्बल तीन दशकांहून अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा बजावणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन बाबुलाल चौधरी यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, शिस्तबद्ध सेवा आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत ही पदोन्नती देण्यात आली असून, जळगाव पोलीस दलात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या सोबत 23 पोलीस अंमलदारांची सहाय्यक पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि पोलीस निरीक्षक श्री. गायकवाड यांच्या हस्ते जनार्दन चौधरी यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाची पदोन्नती बहाल करण्यात आली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

जनार्दन बाबुलाल चौधरी यांची सन १९९६ साली जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यकारी पदावर नियुक्ती झाली होती. सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी पोलीस विभागातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी जबाबदारीने कर्तव्य बजावले आहे. पोलीस मुख्यालय, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन, शनिपेठ पोलीस स्टेशन, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), जळगाव तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली आहे.

सध्या जनार्दन चौधरी हे मोटार परिवहन विभाग (मो.प.वि.), जळगाव येथे कार्यरत आहेत. पोलीस सेवेत त्यांनी नेहमीच कर्तव्याला प्राधान्य देत शिस्त, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भूमिका पार पाडली आहे.

त्यांच्या सेवाकाळात त्यांना वेळोवेळी पदोन्नती मिळाली आहे. सन २०१५ मध्ये त्यांची पोलीस नाईक पदावर पदोन्नती झाली होती. त्यानंतर सन २०१९ मध्ये त्यांना पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर बढती मिळाली. आता दि. ८ जून २०२६ रोजी त्यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound