Home Cities रावेर अन्न प्रशासनाच्या धास्तीने रावेरमध्ये खुले खाद्यतेल विक्री ठप्प !

अन्न प्रशासनाच्या धास्तीने रावेरमध्ये खुले खाद्यतेल विक्री ठप्प !

0
18

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अन्न व औषध प्रशासन विभागाच्या राज्यव्यापी भेसळविरोधी “वॉश आऊट” मोहिमेमुळे रावेर शहर व परिसरातील खुले खाद्यतेल विक्रेत्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवाईच्या भीतीने अनेक व्यापाऱ्यांनी खुले तेल विक्री बंद केल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत छापेमारी, नमुना तपासणी आणि गुन्हे दाखल करण्याच्या कारवाया वेगाने सुरू आहेत. त्याचा परिणाम रावेरमध्येही दिसून येत असून खुले खाद्यतेल विक्री करणारे व्यापारी सावध झाले आहेत.

मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या रावेर तालुक्यात वर्षानुवर्षे खुले खाद्यतेल विक्री होत असल्याचे सांगितले जाते. मात्र अलीकडील कठोर कारवाईमुळे अनेक विक्रेत्यांनी विक्री थांबविल्याचे चित्र आहे.

दरम्यान, नागरिकांनी खाद्यतेलासह हॉटेल, डेअरी, मेडिकल स्टोअर्स आणि रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकविण्यात येणाऱ्या आंब्यांचीही तपासणी करण्याची मागणी केली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound