Home Cities जळगाव आज खगोलप्रेमींसाठी पर्वणी; जळगावसह देशभरात उघड्या डोळ्यांनी दिसणार ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती

आज खगोलप्रेमींसाठी पर्वणी; जळगावसह देशभरात उघड्या डोळ्यांनी दिसणार ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती

0
36


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खगोलप्रेमींसाठी आजची (९ जून २०२६) संध्याकाळ विशेष ठरणार आहे. सूर्यमालेतील दोन तेजस्वी ग्रह शुक्र (व्हीनस) आणि गुरु (ज्युपिटर) आज एकमेकांच्या अत्यंत जवळ आल्याचे दृश्य जळगावसह महाराष्ट्र आणि देशभरातून उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. खगोलशास्त्रात या घटनेला ‘ग्रहांची युती’ (Conjunction) असे म्हटले जाते. या दुर्मीळ दृश्याला जागतिक स्तरावरील विज्ञान अभ्यासकांनी ‘कॉस्मिक किस’ असे आकर्षक नाव दिले आहे.

 


Protected Content

Play sound