Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ; नियुक्तीपत्रांचे वितरण 

मुक्ताईनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ; नियुक्तीपत्रांचे वितरण 

0
23


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत आणि संत मुक्ताईंचे दर्शन घेतल्यानंतर मुक्ताईनगर तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून नव्या पदाधिकाऱ्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.

मुक्ताईनगर येथे आयोजित या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपनेते व संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख योगीराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन गोसावी, तालुकाप्रमुख ॲड. राहुल पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार संतोष मुरलीधर चिकटे (रा. बोदवड) यांची उपतालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच ॲड. देवेंद्र रमेश बोदडे (रा. मुक्ताईनगर) यांच्यावर तालुका समन्वयकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून वसीम दिलदार पिंजारी (रा. मुक्ताईनगर) यांची तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय बाबुराव भावजी बोंडे (रा. इच्छापूर) यांची उचंदा-निमखेडी गटप्रमुखपदी तर साहेबराव देवराम बेलदार यांची निमखेडी गणप्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी उपस्थित नेत्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पक्षाच्या विचारधारेचा प्रसार तळागाळापर्यंत करण्याचे आवाहन केले. आगामी काळात गावपातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने कार्य करावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. संत मुक्ताईंच्या पवित्र भूमीत झालेल्या या कार्यक्रमामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना विस्तारासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


Protected Content

Play sound