Home क्राईम वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर धडक कारवाई ; एमआयडीसीत गुन्हा दाखल

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर धडक कारवाई ; एमआयडीसीत गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर आणि परिसरात अवैध गौण खनिज चोरी आणि विनापरवाना वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामदेववाडी ते वावडदा दरम्यानच्या सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणारा एक डंपर पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या रामदेव वाडी ते वावडदा रोडवरून अवैधपणे वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी २८ मे रोजी रात्री ९ वाजता धडक कारवाई केली. त्यावेळी पोलीसांनी डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ४४३९) हा संशयास्पदरित्या जात असल्याचे पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी डंपर आडविला आणि डंपर चालक मुकेश शिवदास सोंडे (वय ४० वर्षे, रा. वाघ नगर, पाण्याच्या टाकीजवळ, जळगाव) याला वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पो.कॉ. रमाकांत साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात डंपर मुकेश शिवदास सोंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासत आला. पुढील तपास पोलीस अमलदार समाधान टहाकळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound