Home क्राईम इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंटद्वारे अल्पवयीन मुलीची बदनामी ; तरूणावर गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंटद्वारे अल्पवयीन मुलीची बदनामी ; तरूणावर गुन्हा दाखल


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून, सोशल मीडियावर तिची बदनामी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात जळगाव येथील तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर किरण पाटील (वय २२, रा. कुसुंबा, जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

ही घटना आहे भुसावळ शहरातील एका भागातील, या भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. पिडीत मुलीची आणि संशयित आरोपी सागर पाटील यांची जानेवारी २०२३ पासून ओळख होती, या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले. मात्र, मैत्रीचा गैरफायदा घेत संशयित आरोपी सागर याने जानेवारी २०२५ मध्ये पीडित मुलीकडे लग्नाची आणि शारीरिक संबंधांची मागणी केली. पीडितेने ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली. लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने पीडितेचा छळ सुरू केला. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही, सागरने ती घरातून बाहेर पडल्यावर तसेच क्लासला जात असताना तिचा सातत्याने पाठलाग केला. जाहीर ठिकाणी तिचा पाठलाग करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले. तसेच पीडितेच्या संमतीविना इन्स्टाग्रामवर नावाचे एक बनावट अकाऊंट तयार केले. या बनावट खात्यावर त्याने पीडितेचे आणि स्वतःचे एकत्र फोटो पोस्ट करून तिची समाजमाध्यमांवर प्रचंड बदनामी केली. तसेच याबाबत वाच्यता केल्यास पीडितेच्या घरच्यांचे बरेवाईट करण्याची धमकीही त्याने दिली.

या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound