Home क्राईम घरात घुसून विवाहितेचा विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल

घरात घुसून विवाहितेचा विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल


बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील एका गावातील एका २६ वर्षीय विवाहितेचा घरात घुसून विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील एका गावात महिला ही आपल्याकुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २० मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्या आपल्या राहत्या घरात कपडे धुत होत्या. घरात त्या एकट्या असल्याचे पाहून, गावातीलच संशयित आरोपी राहुल कैलास खराटे याने त्यांच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. आरोपीने पीडितेचा हात धरून तिच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला, तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडित महिलेने आरडाओरड व प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला.

दरम्यान पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित अरोपी राहूल खराटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound