Home Uncategorized अमळनेर हादरले: तरुणीचे खाजगी व्हिडिओ मोबाईलमधून चोरून व्हॉट्सॲपवर केले व्हायरल!

अमळनेर हादरले: तरुणीचे खाजगी व्हिडिओ मोबाईलमधून चोरून व्हॉट्सॲपवर केले व्हायरल!


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मोबाईल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एका तरुणीच्या खाजगी आयुष्याशी खेळण्याचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार अमळनेर शहरात उघडकीस आला आहे. एका पीडित तरुणीचे खाजगी व्हिडिओ तिच्याच मोबाईलमधून चोरून, ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘व्हॉट्सॲप’वर व्हायरल केल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अमळनेर शहरासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार अमळनेर शहरातील स्वामी नारायण मंदिरासमोरील मोकळ्या जागेत आणि निलेश भांडारकर यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर घडला. संशयित आरोपी निखिलेश उर्फ राज पाटील (रा. अमळनेर) याने पीडित तरुणीच्या मोबाईलमधून तिचे अत्यंत खाजगी व्हिडिओ चोरून स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने हे खाजगी व्हिडिओ सोशल मीडियाच्या व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि इतर ठिकाणी प्रसारित केले. व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजताच पीडित तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला असून, तिचा विनयभंग झाल्याची तक्रार तिने स्वतः पोलिसांत दिली आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिसांनी संशयित आरोपी निखिलेश उर्फ राज पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे स्वतः करत आहेत.


Protected Content

Play sound