Home Cities जळगाव जिल्हा परिषदेतील बंद लिफ्टचा सर्वसामान्यांना मनस्ताप : बांधकामचे कार्यकारी अभियंता व विद्युतच्या...

जिल्हा परिषदेतील बंद लिफ्टचा सर्वसामान्यांना मनस्ताप : बांधकामचे कार्यकारी अभियंता व विद्युतच्या शाखा अभियंत्यावर संताप !

0
114


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील लिफ्ट वारंवार नादुरूस्त होत असल्याने येथे येणाऱ्या स्त्री-पुरूषांची कुचंबणा होत असून या भोंगळ कामासाठी कारणीभूत असणारे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व विद्युत शाखा अभियंत्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

जळगाव जिल्हा परिषदेत दररोज जिल्ह्यातील कान्याकोपऱ्यातून शेकडो स्त्री-पुरूष कामानिमित्त येत असून त्यांच्यासाठी लिफ्ट ही अत्यावश्यक सेवा बनलेला आहे. तथापि, जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे ही लिफ्ट सदासर्वदा नादुरूस्त असल्याने येथे येणाऱ्यांना मोठा मनस्ताप होतो. सध्या प्रखर उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने उन्हात येणाऱ्यांना लागलीच जिन्याने वरील मजल्यांवर जावे लागत असल्याने त्यांची दमछाक होत असते. तर दुसरीकडे जनतेची लिफ्ट बंद असल्यामुळे अधिकाऱ्यांना वापरासाठी असलेल्या लिफ्टवर बोजा येतो. यामुळे अधिकाऱ्यांना देखील बऱ्याचदा ताटकळत उभे रहावे लागते.

जळगाव जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील आणि विद्युत विभागाचे शाखा अभियंता ए. बी. राजपूत यांच्याकडे या लिफ्टची जबाबदारी असतांना देखील याकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. महिन्यातून किमान चार-पाचदा ही लिफ्ट बंद असल्याने सदर लिफ्ट आणि याच्यावर डागडुजीसाठी करण्यात येणारा खर्च हा नेमका कुठे करण्यात येतो ? यात काही पाणी मुरते का ? बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील व शाखा अभियंता ए. बी. राजपूत यांच्यात काही साटेलोटे आहे का ? याबाबत आता चर्चा रंगली आहे.


Protected Content

Play sound