मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मे महिन्यात वाढलेल्या तीव्र उष्णतेमुळे तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्याने माणसांसह पक्ष्यांनाही पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाथश्री फाउंडेशनतर्फे पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली असून या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

दिनांक १६ मे २०२६ रोजी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत चिंचोल शिवार, चांगदेव शिवार आणि हरताळा शिवार परिसरातील विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याच्या टोपल्या व भांडी ठेवण्यात आली. उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासू नये आणि त्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
नाथश्री फाउंडेशनचे अध्यक्ष मुरलीधर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी फाउंडेशनचे सदस्य आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी देवेंद्र काटे, अनिकेत सोनवणे, प्रशांत पाटील, गोपाळ कोळी, राजू सुरपटणे, रुपेश सोनवणे, ईश्वर सोनवणे, नंदू महाजन, नंदू महानुभाव, दिनेश भोई, संदीप पाटील, अक्षय कोळी आणि लोकेश सुरपटणे यांनी विशेष सहकार्य केले.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा असून नागरिकांनीही अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



