Home अर्थ जळगाव सी.ए. शाखेत ‘पिअर रिव्ह्यू’वर एक दिवसीय प्रशिक्षण उत्सहात

जळगाव सी.ए. शाखेत ‘पिअर रिव्ह्यू’वर एक दिवसीय प्रशिक्षण उत्सहात


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दि इन्स्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडियाच्या (ICAI) जळगाव सी.ए. शाखेमध्ये शनिवार, दिनांक १६ मे २०२६ रोजी “समवयस्क पुनरावलोकन (पिअर रिव्ह्यु)” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तांत्रिक विषयावर एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आय.सी.ए.आय. भवन येथे या अभ्यासपूर्ण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. चार्टर्ड अकाउंटंट्सना त्यांच्या व्यावसायिक कामकाजात अधिक सक्षम आणि अद्ययावत बनवण्याच्या उद्देशाने आयोजित या सत्रात जिल्ह्यातील सी.ए. सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी नावाजलेले तज्ज्ञ सी.ए. अमित अग्रवाल व सी.ए. उन्मेष नार्वेकर यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

याप्रसंगी जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल, उपाध्यक्ष व विद्यार्थी शाखा अध्यक्ष सी.ए. सोहन नेहेते, सेक्रेटरी सी.ए. करण काबरा, कार्यकारी मंडळ सदस्य सी.ए. लक्ष्मीकान्त लाहोटी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘दि इन्स्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडिया’च्या पिअर रिव्ह्यु बोर्डाचे चेअरमन सी.ए. विष्णुकुमार अग्रवाल यांनी दिल्लीहून उपस्थित सर्व सदस्यांसोबत ऑनलाइन प्रणालीद्वारे थेट संवाद साधला. जळगाव शाखेचे अध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल यांनी प्रास्ताविक केले.

प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते सी.ए. अमित अग्रवाल यांनी “पिअर रिव्ह्युचे तर्कसंगत महत्त्व व आवश्यकता” या विषयावर सविस्तर प्रकाश टाकला. सी.ए. अग्रवाल यांनी पिअर रिव्ह्यु प्रक्रियेतील विविध टप्पे आणि रिपोर्टिंग पद्धती सोप्या भाषेत समजावून सांगितली. तसेच त्यांनी “तांत्रिक व व्यावसायिक मानकांचे अनुपालन” या विषयावर बोलताना ऑडीट डॉक्युमेंटेशन, स्टॅन्डर्डस ऑफ ऑडीटिंग, एथीकल रिक्वायरमेंट्स तसेच चार्टर्ड अकाउंटंट्सच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या यासंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण तांत्रिक मुद्दे उपस्थित करून सदस्यांच्या शंकांचे निरसन केले.

यानंतर दुपारच्या दुसऱ्या सत्रात दुसरे प्रमुख वक्ते सी.ए. उन्मेष नार्वेकर यांनी “गुणवत्ता नियंत्रणाच्या सर्वसाधारण व विशिष्ट नियंत्रणाच्या चौकटीचे अनुपालन” या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. या सत्राच्या उत्तरार्धात “नैतिक मानकांचे अनुपालन” या विषयावर सी.ए. नार्वेकर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्रेणिक गिया यांनी केले, तर आभार जळगाव शाखेचे सेक्रेटरी सी.ए. करण काबरा यांनी मानले.

जळगाव येथील आय.सी.ए.आय. भवनमध्ये सी.ए. सदस्यांसाठी ‘पिअर रिव्ह्यु’ आणि गुणवत्ता नियंत्रणावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. सी.ए. अमित अग्रवाल आणि सी.ए. उन्मेष नार्वेकर यांनी तांत्रिक मानके, ऑडिट डॉक्युमेंटेशन आणि व्यावसायिक नैतिकतेवर सखोल मार्गदर्शन केले. या प्रसंगी आयसीएआय पिअर रिव्ह्यु बोर्डाचे राष्ट्रीय चेअरमन सी.ए. विष्णुकुमार अग्रवाल यांनी ऑनलाइन संवाद साधला, तर जळगाव शाखेचे अध्यक्ष सी.ए. रोशन रुणवाल यांनी सदस्यांना व्यावसायिक गुणवत्ता व पारदर्शकता वाढवण्याचे आवाहन केले.


Protected Content

Play sound