भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या भडगाव मंडळ महिला मोर्चाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून महिला संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाने व्यापक स्तरावर पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. महिला मोर्चाच्या मंडळाध्यक्षपदी योजना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून विविध पदांवर अनेक कार्यकर्त्यांना संधी देण्यात आल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम भडगाव मंडळाची महिला मोर्चा कार्यकारणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आली. तसेच मंत्री गिरीश महाजन , प्रदेश महामंत्री राजेश पांडे, मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे, प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महिला अध्यक्षा ॲड. कृतिका आफ्रे आणि भडगाव मंडळ अध्यक्ष विनोद नेरकर यांच्या मान्यतेने ही कार्यकारणी घोषित करण्यात आली आहे.

महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी योजना पाटील यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी गायत्री बिरारी, सुनिता शिंपी, शिला पाटील, सुनिता चौधरी, सोनाली चौधरी, मोनाली बागल आणि नसीम बानो पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी चंदा पाटील, रंजना परदेशी, मनिषा पाटील आणि सुनिता माळी यांची निवड झाली आहे. तसेच चिटणीसपदी भावना राजपूत, हेमलता शिंपी, ज्योती पाटील, शारदा पाटील, मिनाक्षी पाटील, सुनिता पाटील आणि निता भंडारकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
शहराध्यक्षपदी योगिता वाघ, कोषाध्यक्षपदी मनिषा पाटील, प्रसिद्धी प्रमुखपदी मिनाक्षी पाटील तर सोशल मीडिया प्रमुखपदी रूपाली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आली असून विविध समाजघटकांतील महिलांना पक्ष संघटनेत प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या कार्यकारणीतून दिसून येत आहे.
या कार्यकारणीच्या घोषणेनंतर आमदार दिलीप वाघ, महिला नेत्या वैशाली सूर्यवंशी, युवा नेते अमोल शिंदे, किसान संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, पीटीसी चेअरमन संजय वाघ यांच्यासह विविध पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भडगाव तालुक्यात भाजप महिला मोर्चाचे संघटन अधिक प्रभावी करण्यासाठी ही कार्यकारणी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



