Home राज्य महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सेवांवर सरकारचा मोठा दणका; ओला, उबर, रॅपिडो ॲप्स हटवण्याचे...

महाराष्ट्रात बाईक टॅक्सी सेवांवर सरकारचा मोठा दणका; ओला, उबर, रॅपिडो ॲप्स हटवण्याचे आदेश


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांविरोधात राज्य सरकारने मोठी कारवाई सुरू केली असून ओला, उबर आणि रॅपिडो या लोकप्रिय कंपन्यांची मोबाईल अॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून हटवण्याचे आदेश महाराष्ट्र सायबर विभागाने दिले आहेत. राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाचे उल्लंघन, परिवहन विभागाच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर त्रुटी आढळल्याने सरकारने हे कठोर पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील डिजिटल वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound