Home क्राईम होय, दोघा आदिवासी तरूणांना चिरडणारे डंपर बी.एन. अग्रवालचेच ! : चालकावर गुन्हा...

होय, दोघा आदिवासी तरूणांना चिरडणारे डंपर बी.एन. अग्रवालचेच ! : चालकावर गुन्हा दाखल


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहराजवळ राष्ट्रीय महामार्गावर दोन आदिवासी तरूणांचा चिरडणारे डंपर हे बी.एन. अग्रवाल या ठेकेदाराचेच असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, दिनांक १२ मे २०२६ रोजी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास बी.एन. अग्रवाल यांच्या मालकीचे १८६२ या क्रमांकाचे डंपर सुसाट वेगाने येत असतांना या चालकाने दुचाकीला धडक दिली. या जोरदार धडकेत राहूल गणपत ठाकूर ( रा.श्रीकृष्ण कॉलनी मुक्ताईनगर ) आणि राजकुमार गोपाल बारेला (रा. रोहनी बोरी बुजुर्ग, ता. जि. बऱ्हाणपूर ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या दोन्ही आदिवासी तरूणांचा मृत्यू डंपरच्या धडकेत झाल्यानंतर देखील सदर चालकाच्या विरोधात काहीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे मयताच्या आप्तांनी आंदोलन केले. या आंदोलनात आ. चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला कानपिचक्या देत गुन्हा दाखल केल्याची मागणी केली. यानंतर अखेर खूप तासांनी काल रात्री उशीरा बी.एन. अग्रवाल ठेकेदाराच्या मालकीच्या डंपरवरील चालकाच्या विरोधात (त्याचे नाव एफआयआरमध्ये दिलेले नाही ! ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चालकाच्या विरोधात बीएनएसच्या कलम १०६ (१); २८२; ३२४ (४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि १४३ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound