Home क्राईम गिरणा पात्रातून वाळूची अवैध वाहतूक; दोन ट्रॅक्टरवर कारवाई

गिरणा पात्रातून वाळूची अवैध वाहतूक; दोन ट्रॅक्टरवर कारवाई


भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गिरड शिवारात विना परवाना वाळूची चोरटी वाहतूक करताना दोन ट्रॅक्टरमधून ब्रास वाळू चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेले माहितीनुसार, ही घटना ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गिरड शिवारातील गट नं. ६० लगत असलेल्या गिरणा नदी पात्रात घडली. आरोपी आकाश उत्तम चौधरी (रा. मांडकी, ता. भडगाव) याने आपल्या इतर ५ ते ६ साथीदारांसह संगनमत करून कोणत्याही शासकीय परवानगीविना दोन निळ्या रंगाचे विना नंबरचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर गिरणा नदी पात्रात घातले. या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये सुमारे २ ब्रास वाळू बेकायदेशीररित्या भरून तिची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना त्यांना पकडण्यात आले. मात्र, आरोपी ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर आणि ५ हजार रुपये किमतीची २ ब्रास वाळू असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. भडगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound