Home Cities यावल  जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलचा दहावीला शंभर टक्के निकाल ; मुलींनी मारली...

 जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलचा दहावीला शंभर टक्के निकाल ; मुलींनी मारली बाजी


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलने पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, यंदाच्या निकालात मुलींनी विशेष चमकदार कामगिरी करत बाजी मारली आहे.

यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये वैष्णवी युवराज भंगाळे हिने 90.60 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तनुश्री कैलास अहिरे हिने 90 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला असून योगिनी गणेश जावळे हिने 89 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच निधी पंकज पाटील हिने 87.40 टक्के गुण मिळवत चतुर्थ तर प्रांजल श्रीकांत पाटील हिने 85.60 टक्के गुणांसह पंचम क्रमांक मिळवला.

शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद जीवराम महाजन, मुख्याध्यापिका सौ. रंजना महाजन, दीपाली धांडे मॅडम, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत व जिद्द आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे मत शाळा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आले.

दहावीच्या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी लवकरच सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली आहे. शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण निकालामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Previous articleफैजपूरमधील बकरी बाजारामुळे वाहतूक कोंडी ; स्थलांतराची मागणी
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound