Home Cities जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी

जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी

0
101


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणी अध्यक्षपदी अ‍ॅड. पंढरीनाथ चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा वकील संघाच्या कार्यकारिणी निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. रात्री मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड.पंढरीनाथ बाबुराव चौधरी यांनी दीपकराज सोपान खडके यांना पराभूत केले. चौधरी यांना ४११ तर खडके यांना १३६ मते मिळाली. उपाध्यक्षपदी मंजू मुकुंदा वाणी, कोषाध्यक्षपदी जयेश भावसार तर कार्यकारिणी सदस्यपदी लिना अनिल म्हस्के व प्रतिभा मनोहर पाटील यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झालेली आहे. सचिवपदी योगेश रामदास गावंडे हे तर सहसचिवपदी रविता बन्सीलाल देवराज या निवडून आल्या आहेत. सदस्यपदाच्या १० जागांपैकी दोन महिला बिनविरोध निवडून आलेल्या त्यामुळे आठ कार्यकारिणी सदस्य निवडण्यात आले. या निवडणुकीसाठी अ‍ॅड.आर.एन.पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तर ए.आर.सरोदे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound