Home Cities यावल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या यावल ब्लॉक अध्यक्षपदी निलेश फिरके यांची निवड

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या यावल ब्लॉक अध्यक्षपदी निलेश फिरके यांची निवड


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारी महत्त्वाची बातमी समोर आली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमेटीच्या यावल ब्लॉक अध्यक्षपदी निलेश कृष्णा फिरके यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती करण्यात आली असून, स्थानिक स्तरावर काँग्रेस संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

महाराष्ट्र राज्यातील चार जिल्ह्यांतील एकूण ७७ ब्लॉक अध्यक्षांची निवड प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये यावल तालुक्याचे प्रतिनिधित्व करत वड्री येथील निलेश फिरके यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्ष संघटनेत सक्रिय असलेले आणि स्थानिक पातळीवर जनसंपर्क मजबूत असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे आगामी काळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निलेश फिरके यांच्या निवडीचे जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी तसेच युवक नेते धनंजय चौधरी यांनी स्वागत केले आहे. याशिवाय यावल नगरपालिकेच्या उपाध्यक्ष सईदाबी शेख, काँग्रेसचे नगरसेवक, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील, मारूळचे सरपंच सैय्यद असद अली, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, अभय महाजन, प्रदेश कमिटी सदस्य उमेश जावळे, सैय्यद जावेद अली आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound