Home प्रशासन जिल्हा परिषद यावलच्या जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात...

यावलच्या जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन संयुक्तपणे देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या १०७ हुतात्म्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे, आय.टी.आय.चे शिक्षक अशोक चौधरी सर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करत ध्वजाला सलामी दिली. “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय जवान जय किसान” अशा घोषणांनी परिसर देशभक्तीने भारावून गेला.

कार्यक्रमाचे नियोजन व रूपरेषा पर्यवेक्षिका सौ. गौरी भिरूड आणि श्रीमती राजश्री लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध उपक्रमांद्वारे महाराष्ट्राच्या इतिहासाची व कामगारांच्या योगदानाची जाणीव करून दिली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक जाणीव आणि इतिहासाबद्दल आदर निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे महत्त्व पटवून देत शाळेत एकात्मतेचा आणि अभिमानाचा माहोल निर्माण झाला.


Protected Content

Play sound