Home Uncategorized अटलांटा कन्स्ट्रक्शन फसवणूक प्रकरणाची पुढील सुनावणी ३० रोजी

अटलांटा कन्स्ट्रक्शन फसवणूक प्रकरणाची पुढील सुनावणी ३० रोजी


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेतील बहुचर्चित अटलांटा कन्स्ट्रक्शनविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गंभीर आरोप करत, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीने आता कायदेशीर वळण घेतले असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

जळगाव महानगरपालिकेत अटलांटा प्रकल्पाच्या कामात नियमबाह्य कामे आणि भ्रष्टाचाराचा आरोप करत नगरसेवक अरविंद देशमुख, ऍड. शुचिता हाडा आणि ऍड. दिलीप पोकळे यांनी हायकोर्टात धाव घेतली असून त्यांनी याविरुद्ध रीतसर अर्ज दाखल केला आहे. सोमवारी, २७ एप्रिल रोजी या प्रकरणावर हायकोर्टाचे न्यायमूर्ती आहुजा यांच्या न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान अर्जदारांच्या वतीने ऍड. नितीन गवारे पाटील यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली आणि संबंधित प्रकरणातील तांत्रिक बाबी तसेच गैरव्यवहारांचे मुद्दे उपस्थित केले. तसेच, महानगरपालिकेत नुकतेच सत्तेवर आले आहेत, असे सांगून तक्रारदार यांनी आमची बाजू मांडण्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी मागणी केली त्यावर न्यायालयाने यावर पुढील कार्यवाहीसाठी ३० एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकरणामागे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कायदेशीर लढाई लढली जात असल्याने या प्रकरणाला आता मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.


Protected Content

Play sound