जळगाव (प्रतिनिधी) येथील रोटरी क्लब जळगावतर्फे आरोग्यदीप हॉस्पिटल येथे गरीब व गरजू किडनी रुग्णांना हिपेटायटीस बी लस देण्यात आली.
याप्रसंगी अध्यक्ष कॅप्टन मोहन कुलकर्णी, मानद सचिव संदीप शर्मा, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ.काजल फिरके, प्रकल्प प्रमुख डॉ.शशिकांत गाजरे, माजी अध्यक्ष डॉ.जयंत जहागिरदार, सुरेश केसवाणी, डॉ.तुषार फिरके यांची उपस्थिती होती.