Home क्राईम मोठी बातमी : ललीत कोल्हे यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर

मोठी बातमी : ललीत कोल्हे यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बनावट कॉल सेंटर प्रकरणी कारागृहात असणारे माजी महापौर ललीत विजयराव कोल्हे यांना सुप्रीम कोर्टाने आज जामीन मंजूर केला असून यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ममुराबाद रोडवरील एल. के. फार्म येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तेथे बनावट कॉल सेंटर सुरू असून या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी जागेचे मालक ललीत कोल्हे यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली होती. त्यांचा जामीन अर्ज जळगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयात फेटाळण्यात आला होता. यानंतर त्यांचा अर्ज उच्च न्यायालयात देखील फेटाळण्यात आला होता.

दरम्यान, मध्यंतरी झालेल्या जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत ललीत कोल्हे यांनी निवडणूक लढवून यात विजय देखील संपादन केला होता. यानंतर त्यांनी जामीनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यांच्या जामीनावर युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यामुळे त्यांची सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हे कुटुंबिय आणि त्यांच्या समर्थकांना यातून मोठा दिलासा मिळाला आहे.


Protected Content

Play sound