Home Cities अमळनेर घरात घुसून तरुणीचा विनयभंग ; नराधमावर गुन्हा दाखल !

घरात घुसून तरुणीचा विनयभंग ; नराधमावर गुन्हा दाखल !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एका गावात एका १८ वर्षीय तरुणीचा घरात घुसून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १८ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २० एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तरुणी आपल्या घरी एकटी असताना ही घटना घडली. संशयित आरोपी धीरज अनिल पाटील याने तरुणीच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. घरात शिरताच आरोपीने तरुणीचे तोंड दाबले आणि तिला आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिचा विनयभंग केला.

तरुणीने प्रतिकार करत आरडाओरड केली असता, तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि नातेवाईक तात्काळ धावून आले. याप्रकरण मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करीत आहे.


Protected Content

Play sound