जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला जळगाव येथे विविध विषयांसाठी तासिका तत्वावर निदेशक पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी १ पद उपलब्ध असून, संबंधित विषयातील पदवी/डिप्लोमा/आयटीआय (NCVT) पात्रता आवश्यक आहे. तसेच एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या पदासाठी एमबीए/बीबीए/बीसीए पात्रता आवश्यक आहे.

ही पदे तासिका तत्वावर भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज २४ एप्रिल २०२६ पर्यंत संस्थेत प्रत्यक्ष सादर करावेत.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी राणी लक्ष्मीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महिला जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.



