Home क्राईम सायबर गंडा: अमेरिकन फौजीच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक

सायबर गंडा: अमेरिकन फौजीच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमेरिकन लष्करी अधिकारी असल्याचे भासवून एका तरूणाची ३ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत समोर आला आहे. सायबर भामट्यांनी सोशल मीडियाचा वापर करत वरणगावात राहणाऱ्या परप्रांतीय तरूणाकडून मोठी रक्कम उकळली असून, याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी ‘टायलर’ याने फेसबुकच्या माध्यमातून तक्रारदाराशी ओळख वाढवली. त्याने स्वतःची ओळख अमेरिकन लष्करात कार्यरत असलेला अधिकारी अशी करून दिली. विश्वास संपादन केल्यानंतर, ईमेल आणि फेसबुकद्वारे तक्रारदाराला धमकावण्यास सुरुवात केली. या धमक्यांना बळी पडून तक्रारदाराने सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर टप्प्याटप्प्याने एकूण ३ लाख ४७ हजार रुपये वर्ग केले. धक्कादायक बाब म्हणजे, इतकी मोठी रक्कम उकळल्यानंतरही आरोपीने व्हॉट्सॲपद्वारे तक्रारदाराकडे पुन्हा पैशांची मागणी सुरूच ठेवली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound